Ad will apear here
Next
राष्ट्रीय चित्रपट संग्रहालयातील जयकर बंगल्याचे नूतनीकरण
प्रकाश जावडेकर यांच्या हस्ते उद्घाटन
राष्ट्रीय चित्रपट संग्रहालयातील जयकर बंगल्याचे उद्घाटन करताना केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर.

पुणे : पुण्यातील पुरातन वास्तूंपैकी एक असलेल्या राष्ट्रीय चित्रपट संग्रहालयातील जयकर बंगल्याचे नूतनीकरण करण्यात आले असून, केंद्रीय माहिती व प्रसारण तसेच पर्यावरण मंत्री प्रकाश जावडेकर यांच्या हस्ते रविवारी, १५ सप्टेंबर रोजी या वास्तूचे उद्घाटन करण्यात आले. 

या नव्या जयकर बंगल्यात डिजिटल चित्रपट ग्रंथालय असून त्याचा लाभ चित्रपट संशोधकांना त्यांच्या अभ्यासासाठी घेता येणार आहे; तसेच राष्ट्रीय चित्रपट संग्रहालयातील दुर्मीळ चित्रपट वैयक्तिकरित्या पाहण्याची सोयही आहे. या वेळी जावडेकर यांच्या हस्ते जयकर बंगल्याचा इतिहास आणि त्याच्या नूतनीकरणाच्या वैशिष्ट्यांचे महत्त्व सांगणाऱ्या ‘परंपरा’ या पुस्तिकेचेही प्रकाशन करण्यात आले. फिल्म इन्स्टिट्यूटमध्ये प्रशिक्षण घेत असताना एकेकाळी जयकर बंगल्यात असलेल्या महिला वसतिगृहात राहत असलेल्या शबाना आझमी,  रेहाना सुलतान आदी मान्यवर अभिनेत्रींचे आठवणींना उजाळा देणारे लेख यात आहेत.          

        
या वेळी राष्ट्रीय चित्रपट संग्रहालयातील चित्रपट पाहण्यासंबंधी नोंदणी करण्याची सुविधा असलेल्या मोबाईल अॅपचे उद्घाटनही जावडेकर यांच्या हस्ते करण्यात आले.  

‘पुरातन जयकर बंगला म्हणजे कला आणि वास्तुरचना यांचा मनोज्ञ संगम होता. आता नूतनीकरण करण्यात आलेल्या या वास्तूचा लाभ चित्रपटप्रेमी आणि संशोधकांना मिळणार आहे,’ असे जावडेकर यांनी या वेळी सांगितले. या बंगल्याच्या नूतनीकरणासाठी विशेष परिश्रम घेतल्याबद्दल राष्ट्रीय चित्रपट संग्रहालय, तसेच सीसीडब्ल्यू आणि वनसंवर्धन खात्याच्या टीमचे त्यांनी कौतुक केले. या कार्यक्रमास आवर्जून उपस्थित असलेल्या बॅ. जयकर यांची नात प्रसन्ना गोखले यांचा प्रकाश जावडेकर यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

स्वातंत्र्यपूर्व काळातील पुण्याचे ज्येष्ठ नेते आणि पुणे विद्यापीठाचे पहिले कुलगुरू बॅरिस्टर एम. आर. जयकर यांनी १९४० मध्ये वैशिष्ट्यपूर्ण वास्तुरचना असलेला हा बंगला बांधला होता. त्यानंतर या बंगल्याची मालकी प्रथम इंडियन लॉ सोसायटी आणि नंतर फिल्म इन्स्टिट्यूट आणि त्यानंतर राष्ट्रीय चित्रपट संग्रहालयाकडे हस्तांतरित झाली. १९७३ पासून या वास्तूत राष्ट्रीय चित्रपट संग्रहालयाचे कामकाज सुरू झाले.  

‘प्रामुख्याने ग्रेट ब्रिटनमध्ये असलेल्या ‘टूडोर’ पद्धतीच्या वास्तुरचनेचा आधार घेऊन या दुमजली बंगल्याची रचना करण्यात आली होती. लाकडी जिने, लाकडी फ्लोअरिंग हे या बंगल्याचे प्रमुख वैशिष्ट्य होते. १९९० सालापासून सध्याच्या इमारतीत राष्ट्रीय चित्रपट संग्रहालयाचे कामकाज सुरू झाल्यामुळे जयकर बंगल्याचा बराचसा भाग वापरात नव्हता, मात्र आता या बंगल्याचे नूतनीकरण करताना त्याचे जुने वैभव कायम ठेवण्यात आले आहे,’ असे राष्ट्रीय चित्रपट संग्रहालयांचे संचालक प्रकाश मगदूम यांनी सांगितले.    

(नूतनीकृत जयकर बंगल्याची झलक दाखविणारा व्हिडिओ सोबत देत आहोत.) 


 
Feel free to share this article: https://www.bytesofindia.com/P/DZVECE
Similar Posts
‘एनएफएआय’कडे महात्मा गांधी यांच्या दुर्मीळ चित्रफितींचा खजिना पुणे : राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या अस्थि विसर्जनासाठी घेऊन जाणाऱ्या मद्रास ते रामेश्वरम रेल्वेगाडीच्या प्रवासाचे चित्रीकरण, गांधीजींचा दक्षिण भारत दौरा, हरिजन यात्रा अशा अनेक ऐतिहासिक घटनांचे चित्रीकरण असलेल्या चित्रफितींचा दुर्मीळ खजिना राष्ट्रीय चित्रपट संग्रहालयाला (एनएफएआय) मिळाला आहे. महात्मा
‘एनएफएआय’मध्ये चित्रपट जतनासाठी नव्या सुविधा लवकरच पुणे : ‘नॅशनल फिल्म अर्काइव्ह (एनएफएआय) अर्थात राष्ट्रीय चित्रपट संग्रहालयातील दुर्मीळ चित्रपटांच्या रिळांचे जतन करण्यासाठी ‘एनएफएआय’च्या कोथरूड येथील तीन एकर जागेत व्हॉल्ट बांधण्यात येतील. यासंबंधीचा प्रकल्प आराखडा तयार झाला आहे,’ अशी माहिती केंद्रिय माहिती आणि प्रसारणमंत्री प्रकाश जावडेकर यांनी पुण्यात दिली
महात्मा गांधींचे दुर्मीळ चित्रीकरण पाहण्याची संधी पुणे : महात्मा गांधी यांच्या १५०व्या जयंतीनिमित्त दोन ऑक्टोबर रोजी राष्ट्रीय चित्रपट संग्रहालयात महात्मा गांधी यांचे दुर्मीळ चित्रीकरण दाखवण्यात येणार आहे.
‘चित्रपटांमुळे भारत इस्रायल संबंध अधिक दृढ’ पुणे : ‘चित्रपट माध्यमातून भारत आणि इस्रायलमधील सांस्कृतिक संबंध अधिक दृढ झाले आहेत’, असे मत इस्रायलचे प्रसिद्ध चित्रपट निर्माते आणि पटकथाकार डॅन वॉलमन यांनी व्यक्त केले. ‘पुणे इंटरनॅशनल सेंटर’ तर्फे (पीआयसी) आयोजित करण्यात आलेल्या इस्रायली चित्रपट महोत्सवाचे उद्घाटन डॅन वॉलमन यांच्या हस्ते झाले. त्या वेळी ते बोलत होते

Is something wrong?
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
व्यक्ती आणि वल्ली स्त्री-शक्ती कलाकारी दिनमणी
Select Language